काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत धुळ्याचे मिलिंद खैरनार शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत धुळ्याचे मिलिंद खैरनार शहीद

काश्मीरच्या बंदीपुरा चकमकीत धुळ्याचे असलेले वायुदलाचे कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आलंय.

  • Share this:

11 आॅक्टोबर : काश्मीरच्या बंदीपुरा चकमकीत धुळ्याचे असलेले वायुदलाचे कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आलंय. आज पहाटेपासून बंदीपुरामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू होती.

मिलिंद खैरनार हे वायुदलाच्या गरुड कमांडो पथकात सार्जंट होते. अधिक अनुभव यावा म्हणून त्यांनी लष्करासोबत या चकमकीत सहभागी झाले होते. त्याचं वय ३५ होतं.. बंदीपुरामधल्या या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. काल संध्याकाळपासून बंदीपुराच्या हाजीन गावात लष्कराचा पहारा होता. ३ ते ४ दहशतवादी गावात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली होती. रात्रीमध्ये शोधकार्य आणखी तीव्र करण्यात आलं. पहाटे गोळीबार सुरू झाला. १३ राष्ट्रीय राफल्स, ९ पॅरा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं ही संयुक्त कारवाई केली.

First published: October 11, 2017, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading