नवरात्रात मोठ्या हल्ल्याची शक्यता, दिल्लीत घुसले 4 दहशतवादी; मुंबईसह देशभरात हाय अलर्ट

नवरात्रात मोठ्या हल्ल्याची शक्यता, दिल्लीत घुसले 4 दहशतवादी; मुंबईसह देशभरात हाय अलर्ट

बुधवारी दिल्लीला लागून असलेल्या पंजाबमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्यास अटक केली. जो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : दिल्ली स्पेशल सेलच्या छाप्यानंतर महाराष्ट्र हाय अलर्टवर आहे. मुंबईसह राज्यभरात सुरक्षा वाढवण्याच्य़ा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आणि सणा-सुदीच्या काळात घातपात होवू नये यासाठी संबंधित ठिकाणी देखरेख ठेवली जाणार आहे. राजधानी दिल्लीहूनही मोठी बातमी समोर येत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना दहशतवादी दिल्लीत हल्ल्याचा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांनुसार, जैशचे तीन ते चार आत्मघाती दहशतवादी सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर यंत्रणेकडून ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अनेक भागात छापा टाकला असून शोध मोहीम सुरू आहे.

रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर सूचना

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी राजधानीमध्ये सुरक्षेत वाढ केली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषत: बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इतर बातम्या - तुम्हाला नको तर आम्हाला द्या! भाजपने नाकारलेल्या उमेदवाराला NCPने दिलं तिकीट

पंजाबमध्येही एका दहशवाद्याला अटक

दरम्यान, बुधवारी दिल्लीला लागून असलेल्या पंजाबमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्यास अटक केली. जो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता. यापूर्वी एसआयटीने अमृतसर येथून तीन बदमाशांना अटक केली आणि त्यांच्याकडून पाच AK 47, दोन रायफल आणि दारूगोळा जप्त केला आहे. त्यामुळे पंजाबच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

महाराष्ट्रातही सध्या नवरात्रीची धूम आणि विधानसभा निवडणुकांचं वार आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी प्रचंड गर्दी रस्तांवर पाहायला मिळते. त्यामुळे काही घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर बातम्या - भाजप उमेदवाराकडे 500 कोटींची संपत्ती, टॉप कारसह मुंबईत 5 आलीशान फ्लॅट!

पाकिस्तानकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न

पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. पण हा प्रयत्न कधीही यशस्वी होत नाही. हे पाहून आता पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठवली जात आहेत. अलीकडेच पंजाबमधून 4 दहशतवाद्यांना अटक करण्याव्यतिरिक्त एसआयटीला 4 ड्रोन विमानंही मिळाली होती. त्यातील तीन पूर्णपणे नष्ट झाली होती. ते सर्व चीनमध्ये बनविलेले होते.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 3, 2019, 1:05 PM IST

ताज्या बातम्या