सांगली, 11 मार्च : जतमधील उमदी येथे तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. मुलाने आपल्या आई-वडील व बहिणीचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे.
सांगलीतील जतमधील उमदी या भागातील ही घटना आहे. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय 58) असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने वडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय – 82), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय 75) आणि बहीण समुद्राबाई बिरादार (वय 62) यांची राहत्या घरात निघृणपणे हत्या केली. जमिनीच्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सख्ख्या मुलानेच आपले आई-वडील व बहिणीची हत्या केल्याचा संशय असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामागे आणखी कोणते कारण आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. काहींच्या सांगण्यानुसार अरकेरी यांच्या कुटुंबात जमिनीचा वाद सुरू होता. त्यामुळे या हत्याकांडामागे संपत्तीचा वाद असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
हे वाचा - दिवसभर दगड गोळा करायची आणि संध्याकाळी एकमेकांवर तुफान दगडफेक, पाहा हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.