नवी मुंबईतील तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

नवी मुंबईतील तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 02 मे: नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे एमआयडीसीतील (Turbhe MIDC) एका रंगाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

तुर्भे एमआयडीसी मधील बालाजी कलर कंपनीला (Balaji Color Company) आज सकाळी आग लागली. एका कंपनीत आग लागल्यानंतर इतर तिन्ही कंपन्यांमध्ये पसरली आहे. दूरपर्यंत आगीमुळे धुराचे लोट दिसून येत आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, कंपनीला आग कशामुळे लागली हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.

त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण

लॉकडाऊन लागू असल्यामुळे कंपनीत कामगारांची संख्या सुद्धा कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: May 2, 2021, 10:23 AM IST

ताज्या बातम्या