Home /News /maharashtra /

देव दर्शनाला जाणाऱ्या 12 भाविकांवर नियतीनं आणलं विघ्न; भीषण अपघातात क्रूझरचा चक्काचूर

देव दर्शनाला जाणाऱ्या 12 भाविकांवर नियतीनं आणलं विघ्न; भीषण अपघातात क्रूझरचा चक्काचूर

accident

accident

Road accident in Tuljapur: तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या एका क्रूझर गाडीला भीषण अपघात (Terrible accident to Devotee's van) झाल्याची घटना समोर आली आहे. देव दर्शनासाठी जात असताना नियतीनं त्यांच्यावर विघ्न आणलं आहे.

    उस्मानाबाद, 11 डिसेंबर: जालन्याहून तुळजापूर याठिकाणी तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या एका क्रूझर गाडीला भीषण अपघात (Terrible accident to Devotee's van) झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरात वळण घेत असताना, एका अज्ञात वाहनाने क्रूझरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले (1 Devotee died and 11 other injured) आहे. सर्व जखमींवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.जालना जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील अकरा तरुण आणि घनसांगवी येथील एक तरुण असे एकूण 12 जण पंढरपूरला देवदर्शनासाठी क्रूझरने जात होते. पण वाटेत तुळजाभवानी देवीचं मंदिर असल्याने तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे जाण्याचा प्लॅन त्यांचा होता. हेही वाचा-कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर रेप यानुसार तुळजापूरच्या दिशेने जात असताना तुळजापुर-सोलापूर महामार्गावर बार्शी रोड पुलावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने भाविकांच्या क्रूझर गाडीला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा-क्रीडाविश्व हादरलं! सराव संपताच सुरू झाला त्रास; क्रिकेटपटूचा हृदयद्रावक शेवट या घटनेची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमी भाविकांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Crime news, Osmanabad

    पुढील बातम्या