सोलापूर, 23 मे: सोलापूरमधून (Solapur) एका भीषण अपघाताची (Terrible Accident) बातमी समोर आली आहे. पंढरपूर-मोहोळ रोडवर (Pandharpur-Mohol Road) हा अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर सहाजण जखमी झाले आहेत.
ठाण्यात कोठारी कंपाऊंड परिसरात अग्नितांडव, आगीचा Live Video
भावाचे लग्न आटपून परत गावाकडे येत असताना काळाने घाला घातल्याने दोन चिमुकल्यासह डॉक्टर महिला आणि पुरुषासह सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सेलेरो कार आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक बसली. ही दुर्घटना रविवार 23 मे रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर गावच्या शिवारात रमेश माने यांच्या ढाब्यासमोर पंढरपूर पालखी मार्गावर घडली.
या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये दोन डॉक्टर दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मुजाहिद इमरान आतार आणि त्यांची पत्नी आफ्रीन मुजाहिद आतार हे दोघे डॉक्टर आहेत. या अपघातात त्यांच्यासह त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अराफत मुजाहिद आतार आणि दोन वर्षीय भाची इनाया इरफान खान यांचा मृत्यू झाला आहे.
मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कधी आहेत मुहूर्त? येथे जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्तांची यादी
घटनेचं वृत्त समजताच खान आणि आतार यांच्या नातेवाईकांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालयासमोर एकच गर्दी केली होती. इरफान नुरखाँ खान वय 40, बेनजीर इरफान खान 37, मुजाहिद इरफान आतार 37, आफरीन मुजाहिद आतार 27, इनाया इरफान खान 2, अराफत मुजाहिद आतार 10 वर्षे (सर्व रा. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. तर अरहान इरफान खान 10 वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी 35, मनिषा मोहन हुंडेकरी 30 वर्षे (दोघे रा. गादेगाव ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.