मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकरी वडिलांनी घेऊन दिला नाही टॅब, नाराज विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

शेतकरी वडिलांनी घेऊन दिला नाही टॅब, नाराज विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हाताश झालेल्या एका विद्यार्थ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हाताश झालेल्या एका विद्यार्थ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हाताश झालेल्या एका विद्यार्थ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  बीड, 19 जून: सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. त्यात वडिलांनी टॅब घेऊन दिला नाही. त्यामुळे ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हाताश झालेल्या एका विद्यार्थ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  हेही वाचा..धोका वाढला! कोरोनाचा वेग सामूहिक संक्रमणाच्या दिशेनं, तज्ज्ञांची माहिती

  अभिषेक राजेंद्र संत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे ही घटना घडली. अभिषेकनं यंदा दहावीची परीक्षा दिली असून त्याचे वडील शेतकरी आहे.

  10 वी नंतर पुढे काय करावं, यासाठी अभिषेक यांनं ऑनलाईन क्लास लावला होता. मात्र, क्लाससाठी टॅब कम्पलसरी असल्याचं अभिषेकनं घरी सांगितलं होतं. ऑनलाईन क्लास बुडतो म्हणून त्यानं वडिलांकडे टॅब घेऊन द्या, अशी मागणी केली होती. मात्र, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी वडिलांनी अभिषेक याला सांगितलं होतं. मात्र, अभिषेक हट्टाला पेटला होता. त्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे अभिषेकच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ज्याच्यासाठी शेतात काबाडकष्ट करत होता, आता तोच मुलगा सोडून गेल्यानं शेतकरी बाप पूरता खचला आहे.

  अभिषेकने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. मात्र, पुढील महिन्यात त्याचा निकाल येणार आहे. अभिषेक हा शेतकरी कुटुंबातील होता. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक अडचण आहे. त्यात पेरणीचे दिवस सुरू असल्यानं बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

  हेही वाचा..उपासमारीचा बळी! सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, पोटच्या मुलासोबत घेतलं होतं विष

  अभिषेकच्या आत्महत्येप्रकरणी गेवराई पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.

  First published:

  Tags: Beed suicide, Boy suicide, Crime news, Maharashtra news