मंगळवार ठरला 'घातवार': अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले

मंगळवार ठरला 'घातवार': अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले

महाराष्ट्रासाठी आजचा मंगळवार 'घातवार' ठरला आहे. शिर्डी, यवतमाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

शिर्डी, 30 एप्रिल- महाराष्ट्रासाठी आजचा मंगळवार 'घातवार' ठरला आहे. शिर्डी, यवतमाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिर्डी जिल्ह्यात मोटरसायकलवर चाललेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मध्यरात्री २ च्या सुमारास ही घटना घडली. मृत तिघे राहुरी तालुक्यातील धानोरे येथीस असल्याची माहिती मिळाली आहे.

यवतमाळमध्ये ट्रक आणि क्रुझरची जोरदार धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि क्रूझरची भीषण धडक झाली आहे. यामध्ये नववधूसह तीन जणांचा मृत्यु झाला. मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत असताना उपरे कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. त्यांच्या कारला मारेगावपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अक्षरा रेस्टॉरंटजवळ अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. लक्ष्मीबाई उपरे, सानिका किसन गोपाळे आणि साक्षी देवीदास उपरे (नववधू) अशी मृतांची नावं आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना नागपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले आहे.

कोल्हापूर : हरळीजवळ कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्गावर हरळी इथे भरधाव कंटेनरने थांबलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (29 एप्रिल) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारचा अक्षरशः चुरडा झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यमुखी पडलेले सर्व तरुण हे महागाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मित्राला भेटून हॉस्टेलवर परत येत असताना हरळी येथे अपघात झाला.

First published: April 30, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading