मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून हाती लागली टोळी!

दहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून हाती लागली टोळी!

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

शहराशेजारी त्यांनी आपला डेरा टाकून मार्केटची रेकी केली. शिवाय मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना टार्गेट करून तेथून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला.

  • Published by:  sachin Salve
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 10 मार्च : कुलूपबंद दुकानांना टार्गेट करून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आंतरराजीय टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदुर भागातील बजरंगपुरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेत अटक केलीदहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून  हाती लागली टोळी!दहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून हाती लागली टोळी!. या टोळीतील सदस्य शहराबाहेर आपला डेरा टाकून रेकी करून चोरी करायचं असं पोलिसांच्या तपासात पुढे आलं. चोरट्याची टोळी ही मध्यप्रदेशातील इंदुर येथील असली तरी या टोळीतील सदस्यांनी गुजरात, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव असा प्रवास करीत वर्धा गाठली. त्यानंतर शहराशेजारी त्यांनी आपला डेरा टाकून मार्केटची रेकी केली. शिवाय मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना टार्गेट करून तेथून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. आरोपीत अपालसिंग सोलंकी, धरमसिंग सोलंकी, नागरसाहेब गुज्जर यांचा समावेश आहे. यांनी सराफा व्यावसायिकांचे दोन प्रतिष्ठान तोडून लाखोंचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासून इंदूर गाठले. त्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला दहा दिवस इंदूर परिसरात मुक्काम ठोकावा लागला. मात्र, या पोलिसांनी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या चिट्ठीवरून माग काढून आरोपीला ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत केलेली मोठी कारवाई असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी वाचवला मुक्या प्राण्याचा जीव! दरम्यान,  मुंबईतील नरीमन पॉईंट येथील क्वीन नेकलेस वरील हॉटेल मरीना प्लाजा समोरील लाटा रोधक क्यूब मधून एका भटक्या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. या भागात येणाऱ्या अनेक पर्यटकांना कुत्र्याचा आवाज येत होता. मात्र कोणीही त्या कुत्र्याला बाहेर काढण्यास पुढे सरसावले नाही. त्याचवेळी आपल्या पाळीव कुत्र्यांना फेरफटका मारायला आणणाऱ्या एका तरुणाचे लक्ष त्या कुत्र्याकडे गेले. त्याने आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा काढला आणि त्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी धडपड करु लागला. पण कोणीही त्या तरुणाच्या मदतीला आले नाही. तिथून जाणाऱ्या 4 खाकी वर्दीतील पोलिसांना या तरुणाची धडपड दिसली आणि ते तात्काळ त्या तरुणाची मदत करण्यास पुढे सरसावले. एक पोलीस जीवाची पर्वा न करता थेट खाली लाट रोधक क्युब्सवर उतरला. त्या कुत्र्याला उचलून वर कठड्यावर ठेवले आणि त्या कुत्र्याची सुटका केली. क्युब्समध्ये कुत्र्याचा पाय अडकल्याने त्याच्या पायाला इजा झाली आहे. पोलिसांची ही माणुसकी पाहून सोशल मिडियावर याबाबतचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Police, Wardha, Wardha news

पुढील बातम्या