टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात.. महिलेचा होरपळून मृत्यू

टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात.. महिलेचा होरपळून मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोची धडक बसताच रिक्षाने पेट घेतला.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)

नाशिक, 15 सप्टेंबर: नाशिक-पुणे महामार्गावर टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोची धडक बसताच रिक्षाने पेट घेतला. या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता सिन्नर येथील आडवा फाटा परिसरात हा अपघात झाला. टेम्पो चालक मद्यधुंद असल्याचे समोर आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या पेट्रोल टॅकचा स्फोट झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. इतर तिघे गंभीररित्या होरपळले आहेत. त्यात वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी, सिन्नर नगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाने पाणी मारत रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणली. स्थानिकांनी रिक्षा तोडून जखमींना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेड व स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु करत जखमींना उपचारासाठी यशवंत रुग्णालयात दाखल केले आहे.

मद्यधुंद होता टेम्पोचालक..

टेम्पोचालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. टेम्पोने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत तीनजण जखमी झाले. अपघातानंतर नाशिक-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

सातवी पास तरुणाने Youtube व्हिडिओ बघून बनवल्या बनावट नोटा

बनावट चलनी नोटा तयार करण्याचे रॅकेट पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उघड केले. या प्रकरणी रणजीत सुखदेव राजगे (रा.कुसमोड, पिलीव, ता.माळशिरस) या बनावट नोटा तयार करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून बनावट 11 हजार रूपये, नोटा छापण्याची शाई, प्रिंटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले आहे. युटूबच्या युट्युब व्हिडिओ बघून त्याने बनावट नोटा तयार करण्याचे धाडस केल्याचे समोर आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत फिरत होत संशयास्पद...

गणेश विसर्जनच्या दिवशी पंढरपूर शहरात संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी केली असता बनावट नोटा तयार करत असल्याचे आरोपीने कबुली दिली. आरोपीकडून दोन हजार, पाचशे, शंभर,पन्नास अशा बनावट नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करत आहेत.

पेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2019, 1:44 PM IST

ताज्या बातम्या