मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मध्यरात्रीचा थरार, भरधाव टेम्पो उड्डाणपुलावर उलटला, 1 जणाचा मृत्यू

मध्यरात्रीचा थरार, भरधाव टेम्पो उड्डाणपुलावर उलटला, 1 जणाचा मृत्यू

भरधाव मालवाहू टेम्पो  गेवराई शहरात पोहोचला असता जय भवानी सहकारी साखर कारखाना समोर उड्डाणपुलावर उलटला.

भरधाव मालवाहू टेम्पो गेवराई शहरात पोहोचला असता जय भवानी सहकारी साखर कारखाना समोर उड्डाणपुलावर उलटला.

भरधाव मालवाहू टेम्पो गेवराई शहरात पोहोचला असता जय भवानी सहकारी साखर कारखाना समोर उड्डाणपुलावर उलटला.

बीड, 16 डिसेंबर :  बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराईजवळ उड्डाणपुलावर भरधाव टॅम्पो  उलटून भीषम अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर-बीड- धुळे राष्ट्रीय  महामार्गावर गेवराई शहराजवळ मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. भरधाव मालवाहू टेम्पो  गेवराई शहरात पोहोचला असता जय भवानी सहकारी साखर कारखाना समोर उड्डाणपुलावर उलटला. टेम्पो पलटून झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवस बंद राहणार काही सेवा, हे आहे कारण घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग पोलीस गेवराई पोलीस तथा आय आर.बी.चे हायवे कंट्रोलचे पदाधिकारी तात्काळ दाखल झाले होते. त्यानंतर जखमी तातडीने बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असू उपचार सुरू आहे. मयत व जखमी मध्यप्रदेशमधील इंदुर येथील रहिवासी आहेत. पुलावर टेम्पो उलटल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. क्रेनच्या साहय्याने टेम्पोला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. चंद्रपूरमध्ये कारची ट्रॅक्टरला धडक, 4 ठार दरम्यान, चंद्रपूर -मूल मार्गावर ट्रॅक्टर आणि कारचा  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी आहे.  चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर इथं ही घटना घडली आहे. मूल शहरातील रहिवासी असलेल्या योग गोगरी (वय 23) याचा 15 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने योगने आपल्या मित्रांना पार्टी देण्याचे ठरवले होते. दर्शना उधवाणी ( वय 25), प्रगती निमगडे (वय 24), मोहम्मद अमन (वय 23) आणि स्मित पटेल (वय 25) या चार मित्रांसह योग हुंदई क्रेटा गाडीने चंद्रपूर इथं एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना  अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला त्यामुळे भरधाव वेगात असलेली हुंदई क्रेटा गाडी ट्रॅक्टरवर जोरात आदळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
First published:

Tags: अपघात, बीड

पुढील बातम्या