बूट विक्रेत्याच्या दुकानात घुसला टेम्पो, झोपेतच एकाला चिरडले

बूट विक्रेत्याच्या दुकानात घुसला टेम्पो, झोपेतच एकाला चिरडले

अहमदनगर सोलापूर महामार्गावर (Ahmednagar Solapur Highway ) चांदणी चौकात रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 15 नोव्हेंबर : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील नगर सोलापूर महामार्गावर (Ahmednagar Solapur Highway ) शहरानजीक असलेल्या चांदणीचौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या 3 बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे.

अहमदनगर सोलापूर महामार्गावर चांदणी चौकात रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. चांदणी चौकात उत्तर प्रदेशमधून आलेल्या काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला बूट विक्रीचा व्यवसाय करत आहे. याच ठिकाणी हे बूट विक्रेते राहतात. शनिवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते.

ज्या पोलीस अधिकाऱ्याला पाहून थरथर कापायचे गुंड, तोच शार्प शूटर बनला भिकारी

रात्री दोन वाजेच्या सुमारास सोलापूरहून नगरच्या दिशेने एक आयशर टेम्पो जात होता. चांदणी चौकात पोहोचल्यानंतर आरटीओ ऑफिस जवळ अचानक चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या बूट विक्रेत्यांच्या दुकानात शिरला.  गाढ झोपेत असलेल्या तीन जणांना टेम्पोने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की,  भरधाव टेम्पोने भिंत तोडल्यानंतरच थांबला.

या अपघातात  मेहताब शेख (वय -21 राहणार, उत्तरप्रदेश) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुसाईद शेख (वय 25), जावेद शेख (वय -20) हे दोघे जखमी झाले आहेत.

6 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या, फुफ्फुस गायब; नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

इतर दोघे बूट विक्रेते तसेच टेम्पोतील दोन जण असे एकूण 4 जण जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 12:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या