गोमांस घेऊन जाणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर पडला जनावरांच्या अवयवांचा खच

गोमांस घेऊन जाणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर पडला जनावरांच्या अवयवांचा खच

हैद्राबादहून औरंगाबादकडे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो मांजरसुंबा घाटात उलटला. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस होतं.

  • Share this:

बीड, 17 एप्रिल- हैद्राबादहून औरंगाबादकडे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो मांजरसुंबा घाटात उलटला. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस होतं. बुधवारी (17एप्रिल) सकाळी मांजरसुंबा घाटात कोळवाडीजवळ हा अपघात झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. पण टेम्पो उलटल्यानं रस्त्यावर जनावरांचे कापलेले पाय आणि मुंडक्यांचा खच पडला होता.

मांजरसुंबा घाटातून औरंगाबादकडे भरधाव जाणारा टेम्पो (एमएच-25 पी 3185) अचानक उलटला. समोरुन येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. टेम्पोचा चालक गणेश राजेंद्र तट याला ताब्यात घेण्यात आले आहे.

वाचा अन्य बातम्या

'PM Narendra Modi'रिलीजचा मार्ग मोकळा? निवडणूक आयोगासाठी सिनेमाचं स्क्रिनिंग

काँग्रेसचे कालीदास कोळंबकर शिवसेना उमेदवारासाठी प्रचाराच्या मैदानात

पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO

VIDEO: 70 वर्षांपूर्वी टाकलेला बॉम्ब केला नष्ट

First published: April 17, 2019, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading