Home /News /maharashtra /

काय साध्य झालं? MIM च्या खासदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

काय साध्य झालं? MIM च्या खासदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यात धार्मिक स्थळं आजपासून खुली झाल्यावर 8 महिन्यांनी खासदार जलील (Mim Mp imtiaz jaleel) यांनी मशिदीत जाऊन नमाज पठण केली

औरंगाबाद, 16 नोव्हेंबर : गेल्या आठ महिन्यांपासून धार्मिक स्थळं बंद होती. अखेर आत पाडव्याच्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक स्थळंही (Temples open in Maharashtra) सुरू करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी शहागंज येथील बडी मस्जिद येथे नमाज पठण केलं. 'सरकारने धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी उशीर केला, त्यामुळे काय साध्य झालं? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला. राज्यात धार्मिक स्थळं आजपासून खुली झाल्यावर आठ महिन्यांनी खासदार जलील यांनी मशिदीत जाऊन नमाज पठण केली. 'मंदिरं उघडताना अनेक नियम सरकारने केले आहेत. औरंगाबादहून दिल्लीला जाण्यासाठी तीन तास लागतात, त्यावेळी विमानात बाजूच्या खुर्चीवर इतर प्रवासी बसवले जातात. फक्त मास्क वापरा अस सांगितलं जातं. त्यावेळी आपण जवळ बसल्याने कोरोना होत नाही का? धार्मिक स्थळांवर एकत्र आल्यावरच कोरोना होतो का?' असा संतप्त प्रश्न इम्तियाज जलील यांनी सरकारला विचारला. पुणे परिसरातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 18 हजार नव्या नोकऱ्या मिळणार 'आठ महिन्यात सरकारने दिलेले नियम पाळून आम्ही धार्मिक विधी पार पाडले. पहिल्यांदाच ईदच्या वेळी आम्ही घरीच सण साजरा केला. धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी आम्ही करत होतो. हे काही भक्तांसाठी आमची मागणी नव्हती, तर मंदिर किंवा मस्जिद समोर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही मागणी होती. हातावर पोट असणाऱ्या या लोकांना व्यवसाय बंद आहे म्हणून सरकारने काही आर्थिक मदत दिली नव्हती. त्यामुळे या लोकांसाठी आम्ही धार्मिक स्थळ उघडा अशी मागणी केली होती, असंही  जलील यांनी म्हणाले. अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना टोला दरम्यान, मंदिरं उघडण्यावरून शिवसेना भाजप नेत्यांची श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पण 'श्रद्धेच्या बाबतीत  राजकारण होत तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी' असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला. OMG! वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांची सुरू केली बकऱ्यांची चोरी 'मला या श्रेयवादाची कल्पना नाही आणि  त्यावर कोणाविषयी बोलावं असही मला महत्वाचं वाटतं नाही. मात्र, मंदिरं जी काही उघडली गेली आहेत, त्यांनतर जी  काही त्रिसूत्री आहे. तिचा अवलंब व्हावा अन्यथा आज जे श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, असा टोला अमोल यांनी भाजप नेत्यांना लगावला. बिहारमध्ये भाजपची नवी खेळी, या दोन नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ 'आनंद साजरा करताना, सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापरणे, हात धुणे ही त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी तेव्हा कोविडचं संकट संपेल. सण उत्सव असतील, मंदिरं उघडण्याचा सोहळा असेल या सर्व गोष्टीत हे नियम पाळले जायला हवं, असं आवाहनही कोल्हे यांनी केले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या