उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज

उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज

  • Share this:

22 एप्रिल :  राज्यात आत्ताच असह्य उकाडा आहे. त्यातच पुढच्या काही दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा ते लक्षद्वीपच्या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे काही दिवस वातावरणात दमटपणा तयार होऊन उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत, तसंच  विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

सध्या पहाटे गारवा आहे. परिणामी, किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

First published: April 22, 2017, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading