• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • विदर्भात तापमानाचा पारा चढाच! चंद्रपुरात पारा 43 पार, पाहा मुंबई-पुण्यात काय आहे स्थिती

विदर्भात तापमानाचा पारा चढाच! चंद्रपुरात पारा 43 पार, पाहा मुंबई-पुण्यात काय आहे स्थिती

Weather in Maharashtra: आज विदर्भातील सर्वात जास्त तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंदवलं गेलं असून येथील कमाल तापमान 43.3 अंश सेल्सियसवर पोहचलं आहे. त्यामुळे चंद्रपूरातील नागरिकांना मार्चमध्येच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव आला आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 मार्च: कोकणातील उष्णतेची लाट (Heat Wave) दक्षिणेकडे सरकल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी तापमानाची (temperature in maharashtra) तीव्रता कमी झाली आहे. मात्र विदर्भात (Vidharbh) सुर्याचा प्रकोप सुरूचं आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील लोणार, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागातील तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर असणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शक्यतो, दुपारी घराबाहेर पडू नये, तसंच सर्वांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज विदर्भातील सर्वात जास्त तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंदवलं गेलं असून (Max Temperature in maharashtra) येथील कमाल तापमान 43.3 अंश सेल्सियसवर पोहचलं आहे. त्यामुळे चंद्रपूरातील नागरिकांना मार्चमध्येच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव आला आला आहे. हे तापमान सरासरी तापमानाच्या 6 अशांनी जास्त आहे. त्याचबरोबर वर्धा आणि जळगाव जिल्ह्यातही तापमानाने चाळीशी गाठली आहे. वर्ध्यात आज कमाल तापमान 41.1 अंश एवढं होतं, तर जळगावमधील पारा 41 अंश सेल्सियसवर गेला होता. मुंबई- पुणे तापमान गेली दोन दिवस पुणे आणि मुंबईमध्ये सुर्याच्या प्रकोपानंतर आता याठिकाणी सुर्याने काहीशी सौम्य भूमिका घेतली आहे. आज मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सियस होतं, तर किमान तापमान 26 अंश सेल्सियस नोंदलं गेलं आहे. तर पुण्यातील तापमान मुंबईपेक्षा 1 अंशाने जास्त होतं. येथील कमाल तापमान 33 अंश सेल्सियस नोंदलं गेलं आहे, तर पुण्यातील किमान तापमान 21 अंश सेल्सियस एवढं आहे. मुंबईत 1 एप्रिलनंतर 5 एप्रिलपर्यंत तापमान 31 डिग्री इतकं राहील. म्हणजेच पुढील चार - पाच दिवस मुंबईतील तापमान 2 डिग्रीने कमी होणार आहे. (वाचा - Weather Forecast Today हवामान : कोकणातली Heat Wave दक्षिणेकडे सरकली, पण पुण्यात पारा चढाच राहणार) देशात कोरोनाचं सावट असल्याने तोंडाला लावलेलं मास्क डोक्यावर तळपणाऱ्या उन्हाचा त्रास अनेकांना जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. कोरोनामुळे बाहेरचं पाणी, ज्यूस किंवा सरबत पिण्याचीही भिती असल्याने जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच बाहेर पडावं. तसंच घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं. त्याचबरोबर डोक्याला टोपीने किंवा सुती कपड्याने झाकायला हवं जेणेकरून उन्हापासून बचाव करता येईल.
  Published by:News18 Desk
  First published: