30 वर्षांनंतर मिनी महाबळेश्वर गारठले, पारा ४.५ अंशावर

30 वर्षांनंतर मिनी महाबळेश्वर गारठले, पारा ४.५ अंशावर

कोकणातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीत शनिवारी सकाळी सगळ्यात नीचांकी म्हणजेच तब्बल ४.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

  • Share this:

दापोली, शिवाजी गोरे, 09 फेब्रुवारी: कोकणातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीत शनिवारी सकाळी सगळ्यात नीचांकी म्हणजेच तब्बल ४.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर ही नोंद असून शनिवारी सकाळी 7 वा.36 मिनिटांनी झालेली ही नोंद आहे. तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा ही सर्वात नीचांकी तापमानाची ही नोंद झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये बर्फाची चादर, मुंबईकरांसाठी विक्रमी थंडी

दवबिंदू गोठवणारी थंडी दापोलीत पडत आहे. या तापमानाच्या नोंदीचे फोटोही काढून ठेवण्यात आले आहेत. दापोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून दापोलीत चांगलीच थंडी पडत आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेला दापोली परिसर हा समुद्र सपाटीपासून तब्बल तीन हजार पाचशे फूट उंचीवर वसलेला आहे.  समुद्र किनारा केवळ ८ ते १० कि. मी.अंतरावर आहे. हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनच दापोली शहराची निवड ब्रिटिशांनी कॅम्पसाठी केली होती. बदलते राहणीमान उभी राहणारी सिमेंटची जंगले यामध्येही दापोली आपली मिनी महाबळेश्वर ही बिरुदावली जोपासून आहे हे विशेष!

दापोलीचे तापमान १९९७ नंतर सर्वात कमी आलेले ही तापमानाची नोंद आहे. यापूर्वी २ जानेवारी १९९१ साली ३.४ अशी तापमानाची नोंद झाली होती. यापूर्वी ४ ,५ अंश अशी नोंद काहीवेळा झाली आहे. सध्या पडत असलेली थंडी काश्मीर मध्ये पडत असलेला बर्फ यामुळे पडत असल्याचे कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय मोरे यांनी सांगितले. गेले महिनाभर ही थंडी पडत असून याचे एव्हरेज साधारण 11 ते 12 अंश इतके असल्याचे सांगितले.

बिहारचे लोक आले नाही तर महाराष्ट्रातील कारखाने बंद होतील- सुशील कुमार मोदी

First published: February 9, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading