• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • विदर्भात सूर्याचं आग ओकणं सुरूच; पुण्यात पुढील तीन दिवस कसं असणार हवामान?

विदर्भात सूर्याचं आग ओकणं सुरूच; पुण्यात पुढील तीन दिवस कसं असणार हवामान?

एप्रिल महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात सूर्याने विदर्भात आग ओकायला सुरुवात केली असून उर्वरित महाराष्ट्रातीलही तापमानाचा (temperature in maharashtra) पारा वाढत चालला आहे.

 • Share this:
  पुणे, 03 एप्रिल: काल महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने देशातील उच्चांक (Max temperature in india) गाठला होता. काल चंद्रपूरात 43.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपूरासह विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागल्या आहेत. येथील किमान तापमानातही वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीही उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याने विदर्भात आग ओकायला सुरुवात केली असून उर्वरित महाराष्ट्रातीलही तापमानाचा (temperature in maharashtra) पारा वाढत चालला आहे. काय असेल पुण्यातील स्थिती... सध्या पुण्यातील तापमान विदर्भाच्या तुलनेत काही प्रमाणात सौम्य आहे. पण पुढील तीन दिवस पुण्यातील तापमान वाढत जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर पुण्यातील तापमान पुन्हा कमी होऊन 37 अंश सेल्सियसवर स्थिरावेल. आज पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सियस नोंदल गेलं असून उद्यापासून पुण्यातील तापमान वाढत जाणार आहे. उद्या पुण्यातील तापमान 2 अंशांनी वाढून 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहचेल. त्यानंतर पुढील दोन दिवसात पुण्यातील तापमानाचा पारा 41 अंश सेल्सियसवर जाऊन पुन्हा यु टर्न घेईल. हे ही वाचा- पुणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहा:कार; 24 तासांत उच्चांकी रुग्णवाढ त्यामुळे पुण्यासहित महाराष्ट्रातील उर्वरित नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी प्या, त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांत फिक्या रंगाची कपडे घाला, शक्यतो सुती कपडे वापरण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर दुपारच्या वेळी घराबाहेर पडत असाल तर टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करा, असंही वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण किनारपट्टीला दिलासा उर्वरित राज्याचं तापमान वाढत जात असलं तर महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीला उष्णतेपासून काही प्रमाणाक दिलासा मिळणार आहे. याठिकाणी आज दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. असं असलं तरी या भागात पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण ढगाळ वातावरणामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना ऊन कमी लागणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: