कोरोनामुळे तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सर्व सीमा केल्या सील, उभारले चेकपोस्ट

कोरोनामुळे तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सर्व सीमा केल्या सील, उभारले चेकपोस्ट

कोरोना संशयतीच्या तपासणी घुसखोरी रोखण्यासाठी तेलंगणाने महाराष्ट्र सीमेवर 18 चेकपोस्ट उभारले आहेत.

  • Share this:

गडचिरोली, 21 मार्च: कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 63 वर पोहोचली आहे. कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतला आहे. तेलंगणा सरकारने सीमेवर तब्बल अठरा चेकपोस्ट उभारले असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राला लागुन असलेल्या सगळ्या राज्याच्या सीमेवर असे चेकपोस्ट नाहीत, त्यामुळे इतर राज्यातून कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्रात आले तर काय होईल, असा प्रश्न सीमावर्ती भागातल्या जनतेला आहे. महाराष्ट्रातून होणारी संशयीताची घुसखोरी रोखण्यासाठी तेलंगणाकडून नेमकं काय सुरु आहे, याबाबत News18 लोकमतने माहिती जाणून घेतली आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी तेलंगणाचे मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...थायलंडहून आलेल्या जळगावच्या दाम्पत्यानं लपवली माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल

कोरोना संशयतीच्या तपासणी घुसखोरी रोखण्यासाठी तेलंगणाने  महाराष्ट्र सीमेवर 18 चेकपोस्ट उभारले आहेत. महाराष्ट्राच्या हद्दीत तेलंगणासह इतर राज्यातून येणाऱ्या संशयीत रुग्णासंदर्भात कुठलीही दक्षता नाही घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तेलंगणात 24 तास जनता कर्फ्यु राहणार

तेलंगणात रविवारी 24 तास जनता कर्फ्यु राहणार आहे. सकाळी सहापासुन सोमवारी सकाळी सहापर्यंत जनता कर्फ्यु राहील. मेट्रोसह परिवहन सेवाही पूर्ण बंद असेल, अशी माहिती मुख्यमंत्री केसीआर यांनी दिली आहे.

हेही वाचा...जनता कर्फ्यू': एक दिवस आधीच उरकलं लग्न, मास्क बांधून नवरदेव-नवरीनं घेतले फेरे

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकूण 12 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

हेही वाचा...जमावबंदी असताना लग्न समारंभासाठी एकत्र बोलावल्यामुळे चिपळूणमध्ये चौघांवर गुन्हा

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

First published: March 21, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या