पुसद, 18 सप्टेंबर :राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वच जण खबरदारी घेत आहे. पण, कोरोनाच्या भीतीपोटी रक्ताचे नातेही पुढे येत नसल्याचे समोर आहे. पण, यवतमाळमधील पुसदमध्ये नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे तहसीलदारानेच कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.
सध्या यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच मृत रुग्णांचा आकडा ही वाढत आहे. अशातच पुसद येथील एका 62 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. या मृतकाच्या नातेवाईकांनी स्मशानात जाण्याचे टाळले. तेव्हा येथील तहसीलदार वैशाख वाघूरवाहू यांनी पुढाकार घेऊन स्वतः त्या मृत इसमावर अंत्यसंस्कार करून मानवतेचा एक अनोखा परिचय दिला.
कृषी विधेयकांच्या समर्थनासाठी पंतप्रधान मैदानात, विरोधकांवर केला गंभीर आरोप
पुसद शहराच्या श्रीरामपूर परिसरातील एका 62 वर्षीय नागरिकाला कोरोनाची लक्षण असल्या कारणाने त्याला घरीत क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि त्याचा घरातच मृत्यू झाला. या बाबतची माहिती शेजारच्या एका नागरिकाने प्रशासनाला दिली. मात्र, एकही नातेवाईक तिकडे फिरकला नाही.
इंदू मिल कार्यक्रम रद्द प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
तहसीलदार वैशाख वाघूरवाहू यांच्या कानीही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन शव वाहिनीच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत हलवला. मात्र, त्या ठिकाणी सुद्धा एकही नातेवाईक गेला नाही. शेवटी तहसीलदार यांनी पीपीई किट घालून पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रथेप्रमाणे मृतकावर सर्व सोपस्कार पूर्ण करून मुखाग्नी दिली.
एकीकडे कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली. नातेवाईक मृतदेह नाकारतात. मात्र, तहसीलदार वाघूरवाहू यांनी जे कर्तव्य पार पाडले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.