मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर विद्यापीठात 2925 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, डाटा लीक झाल्याचा संशय

नागपूर विद्यापीठात 2925 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, डाटा लीक झाल्याचा संशय

विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे वृत्त विद्यापीठ प्रशासनानं फेटाळलं आहे.

विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे वृत्त विद्यापीठ प्रशासनानं फेटाळलं आहे.

विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे वृत्त विद्यापीठ प्रशासनानं फेटाळलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
नागपूर, 27 ऑक्टोबर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत तांत्रिक अडचणीमुळे 2925 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या 54 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, त्यापैकी 2925 विध्यार्थांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागलं, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे वृत्त विद्यापीठ प्रशासनानं फेटाळलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. हेही वाचा...आमदारकीच्या वर्षपूर्तीचा जल्लोष पडला महागात, MIM च्या आमदाराविरोधात गुन्हा 29 ऑक्टोबरला पुर्नपरीक्षा.. तांत्रिक अडचणीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी 29 ऑक्टोबरला परीक्षेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नागपूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे. पहिल्या दिवशी उडाला होता गोंधळ... दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्या मात्र, पहिल्या दिवशी परीक्षा अॅपमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठाची परीक्षा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 15 विद्यार्थ्यांना ओटीपीबाबत (OTP) तक्रार केली होती. दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेत देखील विद्यार्थ्यांना ओटीपी मिळाला नसल्याच्या तक्रार समोर आली होती. परीक्षा ॲप लॉगइन आणि पासवर्ड टाकल्यानंतर ओटीपी मिळाला नसल्याचं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. बीएससीच्या काही विद्यार्थ्यांना सुमारे अर्धा तास पेपर सुरू करण्यात अडचणी आल्या. विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला त्यातून त्यांना आवश्यक मदत मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. हेही वाचा..Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली, प्रतिबंधित क्षेत्रात Lockdown कायम मात्र, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला होता. वेळेत लॉगइन न करता आलेल्या विद्यार्थ्यांना 20 मिनिटांचा अतिरिक्त कालावधी वाढवून देण्यात आला होता.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus symptoms, Maharashtra, Nagpur

पुढील बातम्या