मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिक्षकांचा 'तो' जीआर रद्द करा,भाजपच्याच संघटनेचा तावडेंना इशारा

शिक्षकांचा 'तो' जीआर रद्द करा,भाजपच्याच संघटनेचा तावडेंना इशारा

 शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीसंदर्भात सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्याच शिक्षक सेलनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलाय.

शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीसंदर्भात सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्याच शिक्षक सेलनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलाय.

शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीसंदर्भात सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्याच शिक्षक सेलनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलाय.

    26 आॅक्टोबर : शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीसंदर्भात सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्याच शिक्षक सेलनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलाय. सरकारला हा एकप्रकारे घरचा अहेर आहे.

    शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी लागू करण्याच्या संदर्भातला एक जीआर सरकारनं काढलाय. यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि ज्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांच्या शाळा या प्रगत शाळा आणि "अ' श्रेणी प्राप्त आहेत. तसंच ज्या माध्यमिक शिक्षकांच्या वर्गाचा निकाल 80 टक्के किंवा अधिक आहे, त्यांनाच वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा लाभ देण्यात येईल; अशी जाचक टाकण्यात आलीय.

    यामुळे राज्यातील अंदाजे 70 टक्के प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात येणार असल्याचा आरोप भाजप शिक्षक सेलनं केलाय. या जीआरमधील अटीमुळे शिक्षकांच्या मनात शासनाप्रती प्रचंड रोष निर्माण झालाय. तसंच या प्रकारच्या आदेशांमुळं शासनाची प्रतिमा मलिन होत आहे, असं सांगत सरकारनं हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी भाजप शिक्षक सेलनं केलीय.

    यासंदर्भात सेलचे पदाधिकारी शिक्षण मृंत्र्यांना भेटणार आहे. जर हा जीआर रद्द केला नाही तर आंदोलनाचा इशाराही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.  सध्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचा घोळ अद्याप संपलेला नाही. शिक्षकांना वरिष्ठ आणि निवडश्रेणी लागू करताना प्रशिक्षण, प्रस्ताव, शैक्षणिक अर्हता अशा अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय. 2009 नंतर प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण अद्यापही झालेलं नाहीत. माध्यमिकचंही प्रशिक्षण रद्द केलंय. अशा परिस्थितीत अशा प्रकारचा जीआर काढल्यानं शिक्षण संतापले आहेत. सर्व शिक्षण संघटना सरकारच्या विरोधात गेल्या आहेत. त्यात भाजपचीच शिक्षक संघटना सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्यावर सरकारच्या विशेषत: शिक्षण खात्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Vinod tawade