Teachers Day : गरीब मुलांची अशीही 'श्रीमंत' शिक्षिका !

Teachers Day : गरीब मुलांची अशीही 'श्रीमंत' शिक्षिका !

गरीब मुलांना शिकवण्याचं काम हाती घेतलंय मुंबईतल्या अँटोप हिल परिसरात राहणाऱ्या दुर्गा यांनी.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट - दिवसेंदिवस शिक्षण घेणं महाग होत चाललंय. यामुळे आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना आपल्या पाल्यांना शाळेव्यतिरिक्त क्लासेस लावणं परवडत नाही आणि म्हणूनच अशाच गरीब मुलांना शिकवण्याचं काम हाती घेतलंय मुंबईतल्या अँटोप हिल परिसरात राहणाऱ्या दुर्गा यांनी.

अँटॉप हिल परिसरात महाराष्ट्र नगर हा झोपडपट्टी असलेला भाग. या भागातील बहुतांश लोकं रोज सकाळी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामधंदा करतात. मिळालेल्या पैश्यातून आपला संसार चालवतात. याच भागात एका छोट्याशा गल्लीत दुर्गा गुप्ता नावाची तरुणी राहते. 2014 ला दुर्गा दहावीच्या परीक्षेला बसली असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडील केटरिंगवाल्याकडे काम करत होते. घरात आई, लहान भाऊ आणि एक लहान बहीण. त्यांची जबाबदारी घेऊन दुर्गानं पुढील शिक्षण सुरू केलं. आता दुर्गा बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून दुर्गाने परिसरातील गरीब मुलांना मोफत शिकवण्यास सुरूवात केली.

सुरुवातीला दहा बाय पंधरा आकाराच्या खोलीत दुर्गाने 3 मुलांना शिकवणं सुरू केलं. सद्याच्या घटकेला 17 मुलं दुर्गाकडे शिकायला आहेत. यात पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंतची मुलं शिकाताहेत. दिवसभर स्वतःचं शिक्षण, त्यानंतर अर्धवेळ खासगी संस्थेत काम करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची आणि संध्याकाळी या मुलांना ती शिक्षण देत आहे. तिला ही प्रेरणा

 VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

First published: September 5, 2018, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading