शिक्षकाने तरुणीला पाठवला अश्लील मेसेज, मनसेनं अर्धनग्र धिंड काढत शिकवला धडा!

शिक्षकाने तरुणीला पाठवला अश्लील मेसेज, मनसेनं अर्धनग्र धिंड काढत शिकवला धडा!

संबंधित शिक्षकाला बेदम चोप देत उघडा करून त्याची धिंड काढण्याचा प्रकार खोपोली शहरात घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

खोपोली, 21 नोव्हेंबर :  खोपोली शहरातील नामांकित जनता विद्यालयांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकाने त्याच विद्यालयातील शिकणाऱ्या तरुणीला अश्लील मेसेज केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधित शिक्षकाला बेदम चोप देत उघडा करून त्याची धिंड काढण्याचा प्रकार खोपोली शहरात घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांत आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

सुरेश भिवा देवमुंडे असं शिक्षकाचं नाव असून तो खोपोली येथील जनता विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थिनीला देवमुंडे हा शिक्षक मागील काही दिवसांपासून अश्लील मेसेज पाठवत होता. याबाबत तरुणीने आपल्या पालकांना तसेच खोपोली शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाची गावातून अर्धनग्न धिंड काढली.

पालकांनी कार्यकर्त्यांसमवेत देवमुंडे शिक्षक राहत असलेल्या घरातून त्याचे कपडे काढून मारहाण करत खोपोली शहरातून धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेबद्दल महाविद्यालयीन तरूणीने खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पण शिक्षकाच्या अशा कृत्यामुळे तरुणींमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरू असतो. शिक्षक विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवतात आणि त्याच गुरूने जर असा काही प्रकार केला तर कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे. असा गुन्हा करणाऱ्या शिक्षकांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस विद्यालयातील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर शिक्षकाचा फोन ताब्यात घेऊन त्याचे कॉल रेकॉर्डही पोलिसांकडून तपासण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या