सुधागड, 18 सप्टेंबर : रायगड (raigad) जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकळेवाडी शाळेतील एका शिक्षकाने (Teacher commits suicide) शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सुधागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल कांबळे (वय 37) असं या शिक्षकाचं नाव आहे. अमोल कांबळे हे अनेक दिवस मानसिक तणावात होते. अचानक त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गावातील एक ग्रामस्थाने कांबळे यांच्या मोटारसायकलला चावी पाहून त्यांना शाळेत पाहण्यास गेले असता कांबळे गळफास लावलेल्या स्थितीत दिसले. ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना ही घटना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोल कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
अमोल कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह त्यांचे मूळ गावी वडजा तालुका वाशीम जिल्हा उस्मानाबाद येथे नेण्यात आला. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कांबळे यांच्यावर मानसिक आरोग्य संदर्भात उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे हे करीत आहेत.
लातूरमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील नागरसोगा गावातील एका 40 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. लालगिर माधवगिर गिरी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. लालगिर गिरी यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. विष पिल्यानंतर ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून घरच्यांना आवाज दिला. त्यानंतर तातडीने गिरी यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आईने आणलेली वेताची छडी तोडून फेकली; Amazon वर जाहिरात पाहून मुलांना सुटला घाम
लालगिर गिरी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे १ हेक्टर ५३ एक्कर जमीन आहे. अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते. पण कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर ते गावात येऊन राहिले होते. त्यांच्यावर बँकेचे आणि काही खाजगी कर्ज झाले होते.
कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येतंय. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलांचं जिवन मात्र आता असहाय्य बनलं आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.