Home /News /maharashtra /

'कट्टर आहोत' म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्याने केला मतदानाचा व्हिडीओ व्हायरल

'कट्टर आहोत' म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्याने केला मतदानाचा व्हिडीओ व्हायरल

उस्मानाबादेत एका मतदान केंद्रावर गोपनीयेतचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान करत असता व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद, 01 नोव्हेंबर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, उस्मानाबादेते  मतदान करते वेळी मतदारकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मतदानाच्या वेळी व्हिडीओच फेसबुकवर व्हायरल केला आहे. औरंगाबाद विभागातील पदवीधर निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान शांततेत सुरू आहे. सर्वच दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला आहे. मात्र, उस्मानाबादेत एका मतदान केंद्रावर गोपनीयेतचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान करत असता व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. भरधाव फोर्ड Endeavour कार नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू मतदान करते वेळी विजय कुरूंद नावाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मोबाइलमध्ये मतदान करत असताना एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो फेसबुकवर अपलोड केला. 'कट्टर आहोत कट्टर राहणार' असा मजकूर लिहून त्याने पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. या प्रकरणी  प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजेपासून 74 मतदार केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. 33 हजार 682 पैकी दुपारी 12 वाजेपर्यंत 6 हजार 940  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सर्व खबरदारी  घेतली जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. खरी लढत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण व भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात पाहण्यास मिळत आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस ही खबरदारी घेत असून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदाना दरम्यान फिजिकल डिस्टन्ससिंगचा फज्जा दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर फिजिकल डिस्टन्ससिंगचा  फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. अनेक मतदारविना मास्क देखील बाहेर पडले आहेत. पंढरपूर तालुक्यातील 8 हजार 151 मतदान मतदारांसाठी 20 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत याठिकाणी हँड सॅनिटायझर, शरीराचे तापमान तपासणी  केली जात आहे. ‘मी तर जन्मत:च मूर्ख आहे’ शहला रशिदप्रकरणी कंगना रणौतचं उपहासात्मक ट्वीट मात्र, मतदारांनी घोळका करून उभारल्याने फिजिकल डिस्टन्ससिंगचा मात्र पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडते निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कोरोनाच्या सर्व नियमांचे  पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील मतदारसंघांमध्ये मतदार एकत्र उभारण्याची चित्र दिसत आहे. त्यामुळे एका बाजूला करण्याची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना नागरिक मात्र कोरोना नियमाचं उल्लंघन करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या