इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)
भुसावळ, 19 जून- बोदवड (नाडगाव) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व पर्यवेक्षिकाचा एकामेकांवर चाकू हल्ला केल्याने एकाच खडबळ उडाली आहे. बोदवड जवळील नाडगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी हा प्रकार घडला आहे.
मिळालेली माहिती अशी की, महिला पर्यवेक्षिका कार्यालयातील कॅबिनमध्ये आपले काम करत होत्या तितक्यात संस्थेतील शिक्षक एकनाथ पाटील हे दुसऱ्या बाजूच्या दरवाज्याने आत घुसले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत झाले. शिक्षक एकनाथ पाटील आणि महिला पर्यवेक्षिकेने एकमेकांवर चाकू हल्ला केल्याचे बोलले जात आहे. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बोदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही जखमींना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनीही जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कारमध्ये स्फोट, चालकाचा कोळसा
दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील बोरज गावाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला. नंतर कारला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की नजीकच असलेले बोरज गाव हादरले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. तसेच कार चालकाच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. पाण्याच्या टँकरने आग विझवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. कारला स्फोटानंतर लागलेली आग विझवल्यानंतर कारमधील चालकाचा मृतदेह पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढला.गाडी कोणाची होती, चालक कोण होता, हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांला लगावला टोला