• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • आदर्श शिक्षकाचे सैतानी कृत्य, विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, गावकऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारले, VIDEO

आदर्श शिक्षकाचे सैतानी कृत्य, विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, गावकऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारले, VIDEO

अरुण राठोड असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.

अरुण राठोड असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.

अरुण राठोड असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.

 • Share this:
  भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 07 ऑगस्ट : शाळा  (school) हे शिक्षणाचे मंदिर समजले जाते आणि शिक्षक (techer) हा विद्यार्थी (student) घडवण्याचे काम करतो. पण, यवतमाळमधील बेलोरा इथं जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शिक्षकीपेशाला काळीमा फासली आहे. आपल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करण्याचे कृत्य या शिक्षकाने केले. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी वर्गात शिक्षकाला कपडे फाडेपर्यंत चोप दिला. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. अरुण राठोड असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. पण, अरुण राठोड याने वर्गातील आपल्याच एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. अरुण राठोड याने पीडित विद्यार्थिनीला चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. गेल्या महिन्यभरापासून तो पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. अखेर याबद्दलची कुणकुण गावातील तरुणांना लागली. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक आणि तरुणांनी शाळेत जाऊन अरुण राठोडला जाब विचारला आणि चांगलाच चोप दिला.

  मुंबईच्या रस्त्यांवर मलायकाची हवा; पडद्यावरच नाही इथेही दिसला फॅशनचा जलवा

  गावकऱ्यांनी अरुण राठोडला कपडे फाटेपर्यंत बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शाळेत पोहोचून गावकऱ्यांच्या तावडीतून शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: