Home /News /maharashtra /

टाटा इंडिका कार झाली आऊटऑफ कंट्रोल, झाडावर आदळून 2 जण जागीच ठार

टाटा इंडिका कार झाली आऊटऑफ कंट्रोल, झाडावर आदळून 2 जण जागीच ठार

खटेश्वर गावाजवळ आले असता अचानक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार थेट लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली.

    यवतमाळ, 08 नोव्हेंबर : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील जोडमोहा इथं भरधाव कार (car accident) झाडावर आदळून झालेल्या भीषण  अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पांढरकवडा रोडवरील खटेश्वर वळणावर ही घटना घडली आहे.  प्रशांत दिगंबर मंडगवार (45) आणि नितीन गोविंद लांगर (37, राहणारा वंजारीफैल यवतमाळ) आणि बहादुरे हे तिघे जण इंडिका कारने पांढरकवडा येथून यवतमाळला जात होते. शिवसैनिकाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं?- भास्कर जाधव VIDEO खटेश्वर गावाजवळ आले असता अचानक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार थेट लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, झाडाला कार आदळल्यानंतर कारचा पार चुराडा झाला. यात समोर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रशांत दिगंबर मंडगवार  आणि नितीन गोविंद लांगर या दोघांचा समावेश आहे. तर बहादुरे हे जखमी झाले आहे. त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोल्हापूर हादरलं, भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला या घटनेची माहिती मिळताच जोडमोहा पोलीस स्टेशनमधील ठाणेदार करेवाड, जोडमोहा बीटाचे जमादार गदई, संजय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातात मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अज्ञात वाहनांची मारुती स्विफ्ट कारला  धडक, 3 जण जागीच ठार दरम्यान, मनमाड-मालेगाव-मनमाड-येवला मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून रोज या मार्गावर अपघात होत आहे.  शनिवारी मालेगाव रोडवर कंटेनर आणि स्कॉर्पिओचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज रविवारी पहाटे येवल्याच्या सावरगाव फाट्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत स्विफ्ट गाडीला भीषण अपघात होऊन त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर  दोन जण जखमी झाले आहे. हे काय...रस्ता तर बांधला, पण पूल बांधायलाच विसरलं सरकार येवला तालुक्यातील धामोडे इथं शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. पाच जण हे मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कारमधून येवल्याकडे येत होते.  मध्यरात्रीच्या सुमारास धामोडे येथे कार आली असता अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती की,  धडक  दिल्याने स्विफ्ट गाडीतील मागे बसलेले तिघेजण जागीच ठार झाले. तर पुढील दोघे जण जखमी झाले आहे.  या दोघांवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.  या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या अज्ञात वाहनाचा तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या