'उद्धव आणि बेताल', भाजपवर वार करणाऱ्या संजय राऊतांवर जहरी टीका

संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 07:51 AM IST

'उद्धव आणि बेताल', भाजपवर वार करणाऱ्या संजय राऊतांवर जहरी टीका

मुंबई, 4 नोव्हेंबर : 'सामना' दैनिक आणि पत्रकार परिषदांमधून रोज भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार 'नागपूर तरुण भारत'च्या अग्रलेखातून आज घेण्यात आलेला आहे. पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ देत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता 'बेताल' असा करण्यात आला आहे. तसंच विदूषक अशीदेखील त्यांची संभावना करत संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

'राज्यात दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्यांचे दुःख वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही हे ही तितकच जळजळीत वास्तव आहे' असे अग्रलेखात म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे यांची राजकीय समज त्यांची परिपक्वता समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडिकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे' अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

'बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राचे सुटका करण्यासाठी घालवली हा बेताल मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. 1990 पासून निवडून आलेल्या जागांचा संदर्भ देत शिवसेना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळाचा संदर्भ देत होती मग ते आता मुख्यमंत्रिपदाबाबात कसा दावा करु शकतात,' असा सवालही या अग्रलेखातून विचारण्यात आलेला आहे.

'संजयनं दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे पण संजय धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी माणसांना चिंतन होणे स्वाभाविक आहे,' असा टोला देखील शिवसेनेला अग्रलेखात लगावण्यात आला आहे. त्यामुळे या जहरी टीकेला संजय राऊत आगामी काळात कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 07:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...