'मोठा भाऊ जनताच ठरवणार ना?' अग्रलेखातून शिवसेनेला शालजोडे

'मोठा भाऊ जनताच ठरवणार ना?' अग्रलेखातून शिवसेनेला शालजोडे

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार काम करण्याची कुवत असणारे नेते सेनेत आहेत? अशा शब्दातून तरुण भारतामधून सेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी

मुंबई, 06 फेब्रुवारी : मंगळवारी भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर आज संघाची विचासरणी असलेल्या 'तरुण भारत'मधून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे.

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार काम करण्याची कुवत असणारे नेते सेनेत आहेत? अशा शब्दातून तरुण भारतामधून सेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. तर यावेळी सेनेच्या संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली.

काल प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची प्रचंड चर्चा रंगली. त्याचे अनेक अर्थ लावण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांची 'आयपॅक' ही कंपनी शिवसेनेच्या प्रचाराची दिशा ठरविण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर दुसरी शक्यता अशीही व्यक्त करण्यात येत आहे की महाराष्ट्रात युतीचा निर्माण झालेला पेच आणि जागावाटपाचा क्लिष्ट मुद्दा सोडविण्यासाठी खास दूत म्हणूनही प्रशांत किशोर यांनी उद्धव यांची भेट घेतली. असे प्रश्न सोडविण्यात किशोर तज्ज्ञ समजले जातात. त्यामुळे स्वत:च्या रणनीतीनुसार निवडणुक लढण्याची कुवत शिवसेनेत नाही अशी टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना शिवसेनेच्या दिग्वीजय सिंगाची भुमिका देण्यात आली आहे. शिवसेनेतल्या दिग्वीजय सिंगाचा वाचाळपणा, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

एकटे लढल्यास सेनेचे चार-पाचही खासदारही निवडूण येणार नाहीत. संजय राऊत कधीही लोकांमधून निवडूण आले नाहीत, मागच्या दाराने त्यांनी प्रवेश केला असं नाव न लिहिता संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेनं खुशाल सत्तेबाहेर पडून सरकारविरोधात भुमिका घ्यावी असा इशाराही तरुण भारतच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा करण्याअगोदर आत्मचिंतन करावं, असा सल्लावजा टोला 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला होता.

"महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने मागितला म्हणून पाठिंबा दिल्याची जी गुर्मीची भाषा उद्धव साहेब सध्या बोलताहेत, ती बघितल्यानंतर परवा परवापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांनी इथल्या सत्तेत सहभाग मिळावा म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांभोवती घातलेल्या पिंग्याचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला दिसतो" असं अग्रलेखात लिहण्यात आलं होतं.

"त्यावेळी सत्तेत सहभागी होण्यासाठीची धडपड नेमकी कुणाची चालली होती, सत्तेतील सहभागाचा निरोप येईपर्यंत घालमेल कुणाची चालली होती, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपासून, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत दररोज उलटसुलट विधाने कोण करत होतं, सत्तेतला सहभाग मिळत नसल्याचे बघून दरम्यानच्या काळात विरोधी पक्षनेतेपद कोणी मिळवलं होतं अन् लागलीच ते पद झिडकारून सरकारमध्ये सहभागी कोण झालं होतं, हे विसरलेत उद्धव ठाकरे इतक्या लवकर? " असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना तरुणभारतच्या संपादकीय मधून विचारण्यात आला होता.

VIDEO : दार तोडून मारूती स्विफ्ट थेट पोहोचली बँकेत!

First published: February 6, 2019, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading