मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दुष्काळाच्या काळात टँकर घोटाळा, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

दुष्काळाच्या काळात टँकर घोटाळा, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा

दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा

दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा

अहमदनगर,20 जानेवारी: दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याचा घणाघाती आरोप कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार जिल्हा नियोजन बैठकीत बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रथमच नगरला आले होते. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाची बैठक झाली. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन भाजप सरकारवर घणाघाती आरोप केले. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयावर मोठा निधी मागितला आहे. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या काळात जिल्ह्यामध्ये टँकर छावणी आणि दिलीप पवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या बैठकीत नवीन सदस्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या या तिन्ही विषयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो शासनाला पाठवण्यात येईल, याची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. रोहित पवार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट फोन लावतात... दरम्यान, गेल्या आठवड्यात संगमनेर येथे तरुणाईला विशेष मेजवानी मिळाली होती. संगमनेरमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात विविध पक्षांच्या तरुण आमदारांची मुलाखत अभिनेते अवधूत गुप्ते यांनी घेतली. या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, आदिती तटकरे, आणि झिशान सिद्धीकी, ऋतुराज पाटील यांनी सहभाग घेतला होता. सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तर दिली. यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच फोनवरून बोलण्याचा उत्तम अभिनय केला. त्यांच्यातलं संभाषण असं झालं...रोहित पवार म्हणाले, मोदी साहेब मी राहित पवार बोलतोय. तुम्ही ओळखलंच असेल. केंद्रात तुमचं सरकार येवून आता वर्ष होईल. तरुणाईला जास्तीत नोकऱ्या कशा मिळतील याची काळी घ्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आलीय त्यामुळे मागच्या पाच वर्षात विकास झाला नाही ते विकास आता होईल. या तरुणांना नोकऱ्या मिळतील असं धोरण ठरवा. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या. केंद्रातच्या धोरणात थोडा बदल करा. आता फक्त चारच वर्ष राहिले आहेत. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा-2020 युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रोहित पवारांच्या या संभाषणाला सगळ्या तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ahmednagar, Drought, Maharashtra news, Rohit pawar

पुढील बातम्या