अखेर तो वादग्रस्त VIDEO हटवला; शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदी आणि तानाजीला अमित शाहांचा मुखवटा

अखेर तो वादग्रस्त VIDEO हटवला; शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदी आणि तानाजीला अमित शाहांचा मुखवटा

पॉलिटिकल किडा नावाच्या Twitter हँडलवर दिल्ली निवडणुकांचे वारे लक्षात घेत हा पॅरडी व्हिडिओ शेअर करण्यात आला. या पोस्टशी आपला संबंध नाही, असं म्हणज भाजपनेही हात झटकले होते.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : तानाजी चित्रपटाचा प्रोमो दाखवून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहांचा चेहरा दाखवलेला एक VIDEO सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला होता. यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेकांनी आक्षेप घेतल्याने अखेर हा व्हिडिओ YouTube वरून हटवण्यात आला आहे. पॉलिटिकल किडा नावाच्या ट्विटर हँडलवर दिल्ली निवडणुकांचे वारे लक्षात घेत हा पॅरडी व्हिडिओ शेअर करण्यात आला. या पोस्टशी आपला संबंध नाही, असं म्हणज भाजपनेही हात झटकले. अखेर पॉलिटिकल किडा नावाच्या हँडलने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.

सध्या सर्व पक्षांना दिल्ली निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असून विविध प्रकारच्या प्रोपोगंड्याचीही सुरुवात झाली आहे. 'पॉलिटिकल किडा' या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. भाजपचं प्रचारतंत्र वाटणाऱ्या या व्हिडिओत ऐतिहासिक संदर्भ असलेल्या Tanhaji चित्रपटातली दृश्य वापरण्यात आल्याने वाद ओढवला.या व्हिडीओशी संबंध नसल्याचं भाजपनेही स्पष्ट केलं होतं. हा व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी सकाळपासूनच होत होती. सोशल मीडियावर या अर्थाच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवं, असे राऊत म्हणाले.

दिल्ली निवडणुकांचा गड़ सर करण्यासाठी तानाजी म्हणजेच गृहमंत्री अमित शहा एकमेव पर्याय असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचं मतदारांचं मतपरिवर्तन करण्यास उद्युक्त करणारे व्हिडिओ येत असतात. मात्र या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखविल्यामुळे शिवभक्त नाराज झाले होते.

या मॉर्फिंगमुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त केला गेला. उदयभान राठोड यांच्या भूमिकेत अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आलं होतं.  तानाजींच्या भूमिकेत अमित शहा दाखवण्यात आलेत. याच प्रोमोत नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवण्यात आल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. तशा प्रतिक्रिया उमटल्याने हा व्हिडिओ अखेर मागे घेण्यात आला.

First published: January 21, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading