VIDEO : तानाजी चित्रपट सुरू असताना थिएटरमध्येच तुफान हाणामारी

VIDEO : तानाजी चित्रपट सुरू असताना थिएटरमध्येच तुफान हाणामारी

तानाजी चित्रपट सुरू होता तेव्हा थिएटरमध्येच दोन गटामध्ये हाणामारी सुरू झाली

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा, 13 जानेवारी :  देशभरात तानाजी सिनेमाची धूम सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा तानाजी चित्रपटाला नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र,  जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये गजानन टॉकीज येथे चित्रपट सुरू असताना दोन गटात युवकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.

तानाजी चित्रपट सुरू होता तेव्हा थिएटरमध्येच दोन गटामध्ये हाणामारी सुरू झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकून मारहाण सुरू केली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले होते, त्यामुळे थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दोन्ही गट भिडले होते. हे तरूण एवढ्यावरच थांबले नाही तर थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरही या दोन गटामध्ये तुफान मारामारी सुरूच होती. मारहाण नेमकी कश्यामुळे सुरू झाली हे मात्र, अजून कळू शकले नाही.

सदर घटनाही चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या मोबाईलमध्ये कैद केली असून याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनर युवकांवर गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहेत.

 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ने तीन दिवसांत 61.75 कोटींची कमाई

दरम्यान, अजय देवगण (Ajay Devgn) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची प्रमुख भुमिका असलेल्या 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ने (Tanhaji: The Unsung Warrior) विकेंडमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. या सिनेमानं पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या तुलनेत शनिवारी आणि रविवारी जास्त कमाई केली. तानाजीनं रविवारी 25 ते 26 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं तीन दिवसांत तानाजीची कमाई ही 61.75 कोटी झाली आहे. तर, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दीपिकाच्या छपाकनं रविवारी 7 ते 7.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं या सिनेमाची तीन दिवसांची कमाई 18.67 कोटी झाली आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणच्या या सिनेमानं पंजाब, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये जास्त कमाई केली आहे. या सिनेमाला जवळजवळ 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर, दीपिका पदुकोणच्या सिनेमाने पहिल्या दिवशी 4.77 कोटी कमाई केली होती. तर, दुसऱ्या दिवशी 30-40% जास्त कमाई केली होती. त्यामुळं शनिवारी आणि रविवारी छपाकनं जवळ जवळ 35 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Published by: sachin Salve
First published: January 13, 2020, 5:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading