एका रात्रीत संपला 38 लोकांच्या आयुष्याचा प्रवास, सिनेमाचा सेट ते हायवेवर गमावला जीव

एका रात्रीत संपला 38 लोकांच्या आयुष्याचा प्रवास, सिनेमाचा सेट ते हायवेवर गमावला जीव

एका रात्री 6 भीषण अपघात, 40 लोकांच्या आयुष्याचा संपला प्रवास.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : एका रात्रीत 40 जणांवर काळानं घाला घातला आहे. फिल्म सेटपासून ते हायवे अपघातपर्यंत वेगवेगळ्या अपघातामध्ये 40 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देशात बुधवारची रात्री अपघातांची रात्र म्हणून ओळखली जाणार आहे. खासगी बसपासून कार अपघातापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. फिल्म शूटिंग दरम्यानही एक अपघात झाला त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सर्वात मोठा अपघात तमिळनाडूतील अविनाशी इथे झाला. तमिळनाडूमधील अविनाशी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि लॉरीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात 20 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बंगळुरुहून कोचीला निघाली होती. त्यावेळी अविनाशी इथे भरधाव बसची लॉरीसोबत धडक झाली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की बसचा पुढचा काही भाग लॉरीखाली गेला.

केरळमध्ये सलेम इथे पर्यटकांनी भरलेली बसची दुसऱ्या बसला धडक झाली. या अपघातात नेपाळी 6 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे पर्यटक दर्शनासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-महिला शिक्षिकेने मुंडन करून राहुल गांधींना पाठवले केस, वाचा काय आहे कारण?

तिसरा अपघात सुपरस्टार कमल हसन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर भीषण अपघात झाला आहे. चेन्नईच्या ईवीपी स्टूडिओमध्ये क्रेनच्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेन कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 लोक जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, कमल हासन रुग्णालयात पोहोचून लोकांची काळजी घेत आहे. हा भीषण अपघात झाला तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित होते.

चौथा भीषण अपघात चंद्रपुरात झाला आहे. हायवेवरची प्रवासादरम्यान बुधवारची रात्र शेवटची ठरली. गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.

पाचवा अपघात माणगाव रोडवर झाला आहे. पुणे माणगाव रोडवर ताम्हानी घाटात कोंडे सर गावाजवळ रात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. पुण्याहून दिवेआगर इथे जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात झाला आहे.

सहावा अपघात वर्धातील आहे. भरधाव कंटेनरने कारला धडक दिली आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूर अमरावती महामार्गावरील तळेगाव जवळील खडका शिवारातील घटना आहे. दुर्घटनेनंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा-Coronavirusचा कहर! क्रूझवरील 2 प्रवाशांचा मृत्यू तर 7 भारतीयांना कोरोनाची लागण

First published: February 20, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या