Home /News /maharashtra /

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, हनुमानाला दंडवत घालून वानराने सोडले प्राण, सांगलीतला VIDEO

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, हनुमानाला दंडवत घालून वानराने सोडले प्राण, सांगलीतला VIDEO

. शनिवारी गावातील नागरिक मंदिरात बजरंगबलीची मनोभावे पुजा, आरती करत होते. यावेळी एक वानर थेट मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले.

सांगली, 04 जानेवारी : सांगली (sangali) जिल्ह्यातील मिरजमध्ये बजरंगबलीच्या (hanuman temple) भक्ताचे अनोखे रुप पाहण्यास मिळाले.  हनुमान मंदिरात मारुतीरायाला दंडवत घालत एका वानराने प्राण सोडल्याची मनाला चटका लावणारी  आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी ही घटना घडली. शनिवारी  गावातील नागरिक मंदिरात बजरंगबलीची मनोभावे पुजा, आरती करत होते. यावेळी एक वानर थेट  मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले. दंडवत घातल्यानंतर आहे त्या ठिकाणीच त्या वानराने आपला जीव सोडला. ही घटना मंदिरात असलेल्या नागरिकानी मोबाईलमध्ये कैद केली. नागरिकांना देखील मंदिरात घडलेला हा प्रकार आश्चर्यकारक वाटत आहे. मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी गावात  पुरातून  दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात  शनिवारी सकाळी आश्चर्यकारक  घटना घडली ज्याची सध्या गावात आणि पंचक्रोशीत बरीच चर्चा आहे. माणसं जशी सहजपणे मंदिरात येऊन दर्शन घेतात अगदी तशाच पद्धतीने एका वानराने हनुमानाच्या मूर्तीचे दंडवत घालत दर्शन घेतले. समोरील मूर्ती, बाजूच्या मुर्तीचे दर्शन घेत असलेल्या या वानराचा व्हिडीओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद  केलाय. विशेष म्हणजे, दंडवत घालून झाल्यानंतर या वानराने आहे त्या जागीच प्राण सोडला. हीच घटना नागरिकांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक ठरली. अनेकांसाठी ही घटना आश्चर्यचा धक्का देणारीच होती. पण गावातील  हे हनुमान मंदिर प्राचीन असल्याने या मंदिरात ही घटना घडल्याने अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पूजा करतात. त्याच शनिवारी या वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त होत आहे. वानराने प्राण सोडल्यानंतर वानराचे दर्शन घेऊन नागरिकांनी  मंदिराशेजारी त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या