'
ठाणे, 30 जून : ठाणे महापालिकेच्या (thane municipal corporation) आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. निष्काळजीपणामुळे महिलेला तीन डोस दिल्याचे उदाहरण ताजे असताना आता चक्क 55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली. जिवंत माणसाला फोन करुन तुमचा मृत्यूचा दाखल (death certificate) तयार आहे असं सांगण्यात आलं.
ठाण्यात राहणारे शिक्षक चंद्रशेखर देसाई यांच्या सोबत ही घटना घडली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याने चंद्रशेखर देसाई यांना फोन केला आणि तुमच्या घरात कुणाचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे का अशी विचारणा केली. सुरुवातील या कर्मचाऱ्याला चंद्रशेखर देसाई यांच्याबद्दलच विचारणा करायची होती. पण, खुद्द चंद्रशेखर देसाई बोलत असल्यामुळे नेमकं समोर कोण बोलत आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्याचा पुरता गोंधळ उडाला होता. ठाणे पालिकेचा कर्मचारी आणि देसाई यांच्यातील असा झाला संवाद...
चंद्रशेखर देसाई : हॅलो
ठाणे मनपा कर्मचारी : गुड आफरटनून सर, ठाणे म्युनसिपल कार्पोरेशन मधून बोलतोय.
चंद्रशेखर देसाई : कुठून
ठाणे मनपा कर्मचारी : ठाणे महानगरपालिका
चंद्रशेखर देसाई : बोला !!!
प्रेग्नेंट झाली होती अवघ्या 5 वर्षांची चिमुरडी, Healthy बाळाला दिला जन्म
ठाणे मनपा कर्मचारी : मानपाडा ठाणे हाच आहे का एड्रेस त्यांचा?
चंद्रशेखर देसाई - हो हो कसा संदर्भात?
ठाणे मनपा कर्मचारी : एक्चुली सर, त्यांची डेथ झालीये सर त्यांचे डेथ सर्टिफिकेट आलंय. चंद्रशेखर देसाईंचा…
चंद्रशेखर देसाई : कोणी सांगितले? मी बोलतोय स्वत: …
ठाणे मनपा कर्मचारी : सॉरी सर, चंद्रशेखर… तुम्हीच बोलताय का? मग तुमच्या घरात कोणाची डेथ झालीये का? कोविडमुळे?
चंद्रशेखर देसाई : नाही
ठाणे मनपा कर्मचारी : तुमचा रिपोर्ट आधी पॉझिटिव्ह आला होता का?
मोठी बातमी! मुंबईत पार्किंगमध्ये आढळली 48 जिवंत काडतुसं; घटनेनंतर परिसरात खळबळ
चंद्रशेखर देसाई : माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ॲागस्टमध्ये.
ठाणे मनपा कर्मचारी : ॲागस्टमध्ये होता. ओके
चंद्रशेखर देसाई : पण हे असं कसं होवू शकतं मॅडम?
ठाणे मनपा कर्मचारी : इकडे माझ्याकडे रेकॉर्ड आला होता. एड्रेस हाच आहे ना सरस तुमचा मानपाड्याचा.
चंद्रशेखर देसाई : हो
ठाणे मनपा कर्मचारी : औके औके … ठीक आहे सर…
चंद्रशेखर देसाई यांना जिवंतपणी मृत दाखवल्या प्रकरणी ठाणे मनपाच्या आरोग्य विभागाने ICMR आणि COWIN app वर खापर फोडलंय तर ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांनी हा तांत्रिक घोळ असल्याचं सांगितलं आहे. नेहमी प्रमाणे याही वेळेस ठाणे महानगरपालिकेच्या विभागात ताळमेळ तर नाहीच, पण संवादाचीही कमतरता असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane