संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, दानवेंचा टोला

संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, दानवेंचा टोला

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, असा टोला दानवेंनी लगावला.

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलं.

भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागलं आहे. पण, आम्ही अनेक वेळा सत्तेत आलो. परंतु, सत्तेत येण्याआधीच संजय राऊत यांना वेड लागलं आहे. काय बोलावं का बोलू नये हे त्यांना सूचत नाही. त्यामुळे वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असं टोला दानवेंनी लगावला.

'अजित पवारांना क्लिन चीट शासनाकडून नाही'

असा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. अजित पवारांचा निर्णय हा कोर्टाच्या अखत्यारित आहे, असं सांगत अजित पवारांना मिळालेल्या क्लिन चीट विषयावर दानवेंनी बोलण्याचं टाळलं.

'आमदारांना हॉटेलमध्ये का डांबलं'

भाजपचे आमदार मतदारसंघात आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार मात्र फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार झोडत आहेत. हॉटेल का बदलत आहे, हे आम्हाला अजूनही कळत नाही. आम्ही कोणत्याही आमदाराला धमकावलं नाही, असा दावाही दानवेंनी केला.

'राज्यपालांची भूमिका योग्यच'

काँग्रेसने कोणाला विधिमंडळ गटनेतेपद अजून दिलेलं नाही. मग कुणाला निमंत्रण देणार? शिवसेनेनं अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अजून ठरवलेला नाही. राष्ट्रवादीने निवडलेल्या गटनेत्याने भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसचा तर अजून गटनेताच निवडला गेलेला नाही. राज्यपाल अशा परिस्थितीत काय निर्णय घेणार? राज्यपालांनी घटनेची चौकट पाळूनच निर्णय घेतला आहे, असा दावा दानवेंनी केला.

'कपिल सिब्बलांची सेनेनं मदत कशी घेतली'

सेनेच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण शिवसेनेला स्वतःचा वकील नेमता आलेला नाही. कपिल सिब्बलांनी सेनेची बाजू मांडली. मध्यंतरी कपिल सिब्बल यांनीच राम काल्पनिक आहे. वास्तव नाही, असं वक्तव्य केलं होतं. मे 2014 मध्ये संजय राऊत यांनी कपिल सिब्बलांवर लेखही लिहिला होता. आता त्यांचीच मदत घेऊन केस लढत आहे, अशी टीकाही दानवेंनी केली.

====================

Published by: sachin Salve
First published: November 25, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading