• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, थेट महिला आयोगाने दिले पोलिसांना आदेश

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, थेट महिला आयोगाने दिले पोलिसांना आदेश

अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...

अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...

अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...

 • Share this:
  जळगाव, 03 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) भोसरी जमीन व्यवहारामुळे आधीच ईडीच्या चौकशीमुळे अडचणीत सापडले आहे. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाने (womens commission) सूचना दिल्या आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईकरून अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अहमदनगरमध्ये कोरोनाचा धोका वाढला, 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन! या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी 2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर येथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी 7 सप्टेंबर 2017 रोजी अंजली दमानिया यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आर्यनसोबत असलेला Arbaaz Merchantt कोण व त्याचे सुहाना खानसोबत काय कनेक्शन ? दरम्यान, कुठलीही कार्यवाही होत नसल्याने अंजली दमानिया यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: