मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माढामध्ये वाळू माफियांची मुजोरी;तहसिलदाराला मारहाण

माढामध्ये वाळू माफियांची मुजोरी;तहसिलदाराला मारहाण

वाळू माफियांचा ट्रॅक्टर अडवल्याने त्यांनी ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घातला

वाळू माफियांचा ट्रॅक्टर अडवल्याने त्यांनी ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घातला

वाळू माफियांचा ट्रॅक्टर अडवल्याने त्यांनी ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घातला

09मे: माढ्याचे तहसिलदार सदाशिव पडदुणे यांना वाळु माफियाने मारहाण केल्याची घटना काल रात्री पावणे बाराच्या सुमारास घडलीय. माढा तालुक्यातील मुंगशी गावाच्या हद्दीत ही घटना घडलीय. वाळू माफियांचा ट्रॅक्टर अडवल्याने त्यांनी ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घातला. मात्र तरीही तहसीलदार पडदुणे मागे हटले नाहीत. त्यानंतर वाळू माफियांनी तहसिलदारांच्या पोटात लाथ मारल्याने ते खड्ड्यात पडले. त्यामुळे त्यांचा पाय फॅक्चर झालाय. या मारहाणीत चार गावकामगार, तलाठी थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला व हाताला जखम झाली आहे. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये सागर शंकर लोंढे, टॅक्टर चालक रघु कृष्णा खरात, मंगेश माणिक जगताप या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आठवड्यातील सोलापूर जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे महसूल विभाग वाळू माफियांना चाप केव्हा लावणार असा सवाल आता उपस्थित झालाय.
First published:

Tags: India, Mumbai, महाराष्ट्र, माढा, मुंबई

पुढील बातम्या