रायचंद शिंदे (प्रतिनिधी)
आंबेगाव, 15 जुलै- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तहसिलदार सुषमा पैकेकरी व त्यांचा लिपिक दिनकर लाडके यांनी कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारा व्यावसायिक यांच्याकडून 50 हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली.
घोडेगाव येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वहातुक करणारी ट्रक आणून ठेवली होती. तहसिलदार सुषमा पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रूपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले.
तक्रारदार व तहसिलदार सुषमा पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रूपये दंड व 1 लाख रूपये लाच देण्याचे ठरले. यावरून तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सायंकाळी 6 वाजता तहसिल कार्य़ालयामध्ये 50 हजार रूपयांची रोख लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते, पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर, सीमा मेहंदळे, पोलीस हवालदार रशिद खान, दीपक टिळेकर, अभिजीत राऊत यांनी ही कारवाई केली.
SPECIAL REPORT:बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड