Home /News /maharashtra /

गाडी बाजूला घे सांगितलं म्हणून पोलिसावरच तलवारीने वार, पंढरपुरातील घटना

गाडी बाजूला घे सांगितलं म्हणून पोलिसावरच तलवारीने वार, पंढरपुरातील घटना

लक्ष्मी टाकळी परिसरात जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे आपल्या वाहनावरुन निघाले होते.

पंढरपूर, 09 फेब्रुवारी : पंढरपूरमध्ये (pandharpur) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज तर गुन्हेगारांनी पोलिसांच्या वर्दीवर वार केला आहे.  गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगितले म्हणून गुंडांनी पोलीस हवालदावर ( Police constable ) तलवारीने (sword) हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी टाकळी भागात ही घटना घडली असून पोलीस कर्मचारी यात जखमी झाला आहे. (विचित्र त्वचा असलेली Miracle baby; डॉक्टरांची मृत्यूची भविष्यवाणीही खोटी ठरवली) लक्ष्मी टाकळी परिसरात जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे आपल्या वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक स्कार्पिओ गाडी उभी होती. हे वाहन बाजूला घेऊन रस्ता मोकळा करून द्या, असं वाडदेकर यांनी संबंधितास सांगितलं. इतक्यात एकाने 'तू मला सांगणार का' म्हणत वाडेदकर यांना मारहाण सुरू केली. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने येऊन तलवारीने वाडदेकर यांच्यावर वार केला. परंतु, त्यांनी तो वार चुकवला. या झटापटीत वाडदेकर यांना दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (मंगेशकर कुटुंबीय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकरांवर नाराज, पत्र आले समोर!) जखमी अवस्थेत वाडदेकर यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंढरपुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या