रत्नागिरी, 18 जुलै : राज्यभरात पावासाने जोरदार (maharashtra rain) हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत पाण्यात उतरू नका, अशी सूचना वारंवार दिली जाते. मात्र, काही जण नको ते धाडस करून जीव धोक्यात घालतात, रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील संगमेश्वर (Sangameshwar) तालुक्यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतांना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी इथं आज दुपारी ३.३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (वय 32), चेतन सूर्यकांत सागवेकर (18) दोघेही राहणार धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली.
रात्री उपाशी पोटी झोपायची सवय आजच बंद करा; आरोग्य घालताय धोक्यात...
या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार (27) , शुभम शांताराम चव्हाण (20) , राज तुकाराम चव्हाण (18), साईल संतोष कांगणे (17) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. शैलेश आणि चेतनच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी चेतनचा बुडून मृत्यू झाल्यामुळे सागवेकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अमरावतीत खारतळेगाव येथे काका पुतण्या गेलेत वाहून
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे काका पुतण्या वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दर्यापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पाय घसरून प्रवीण गुडधे व अनिल गुडधे अशी वाहून गेलेल्या व्यक्तीची नावे आहेत. भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांना माहिती मिळताच तात्काळ त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरू केली मात्र त्यांचा पत्ता अद्याप लागलेला नाही. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील आढावा घेतला आहे. तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.