कराड, 07 फेब्रुवारी : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore National Highway) मारुती स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार झाले आहे. एक जण जखमी असून तातडीने रग्णालयात हलवण्यात आले आहे.
कराड तालुक्यातील वहागाव गावच्या हद्दीत दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोल्हापूरहून (MH07AB5610) या स्विफ्ट डिझायर कारने पाच जण पुण्याच्या दिशेने जात होते.
उद्धव ठाकरेंना कोणतंही वचन दिलं नव्हतं, अमित शहांचा पुन्हा एकदा मोठा खुलासा
भरधाव स्विफ्ट कार वहागाव या ठिकाणी पोहोचली असता अचानक वाहनचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी सरळ महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारचा संपूर्णपणे चक्काचूर झाला.
कर्तव्यदक्ष टिंकीसाठी पोलिसांकडून अनोखी आदरांजली; गुन्हेगारांमध्ये होती दहशत
या कारमधील पाच जणांपैकी तीन जण जागीच ठार झाले. घटनास्थळी स्थानिकांनी जखमी लोकांना बाहेर काढले. तातडीने जखमी झालेल्या एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.