पुण्यात स्विफट कारला आग, 3 प्रवाशांचा जळून मृत्यू

पुण्यात स्विफट कारला आग, 3 प्रवाशांचा जळून मृत्यू

कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद येथे स्विफ्ट डिझायर गाडीने पेट घेतल्याने 3 जणांचा जळून मृत्यू झाला

  • Share this:

23 आॅगस्ट : कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद येथे स्विफ्ट डिझायर गाडीने पेट घेतल्याने 3 जणांचा जळून मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की गाडीतल्यांना बाहेर पडायची संधीच मिळाली नाही. तिन्ही मृतदेह जळून खाक झाले.

मध्यरात्री दीड वाजताची ही घटना असून तिघे ही मेडिकल व्यावसायिक होते. पुण्यावरून घरी जात असताना, प्रशांत चासकर यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर अपघात झाला. गाडीने पेट घेतल्यानंतर तिघांचा जागीच  जळून मृत्यू झाला आहे. दिलीप नवले(पारनेर), नरेश वाघ(पिंपळवंडी),प्रशांत चासकर(वडगाव आनंद) अशी मृतांची नावं आहेत.

First published: August 23, 2017, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading