तूर विकली नाही, ना मोसंबी ; म्हणून फेकून दिली

तूर विकली नाही, ना मोसंबी ; म्हणून फेकून दिली

मोसंबीला केवळ 5 ते 10 रूपये प्रतीकिलो भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न निर्माण झालाय.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

29 एप्रिल : शेतकरी तुरीमुळे कसा मेटाकुटीला आलाय या बातम्या आपण रोज बघतो वाचतो. आता ज्या फळबागेकडे शेतकऱ्यांच्या आशा होत्या त्याही संपल्यात. कारण मोसंबीला केवळ 5 ते 10 रूपये प्रतीकिलो भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न निर्माण झालाय.

कृष्णा पवार हा औरंगाबाद तालुक्यातल्या पिंप्रीराजा गावचा तरूण शेतकरी...पाऊस चांगला झाल्याने त्याने दोन एकरावर चांगली तूर पिकवली...आणि उरलेल्या तीन एकरावर मोसंबीची बाग फुलवली

आठ क्विंटल तूर सरकारनं खेरदी करण्यास नकार दिला. कृष्णाला वाटलं तुरीतून नाही तर मोसंबीमधून चांगले पैसे मिळतील. मात्र त्याच्या दुर्दैवाचा फेरा संपला नव्हता.. त्यानं मोठ्या आशेनं मोसंबी बाजारात नेली आणि मोसंबीला मिळाला केवळ पाच रुपये किलो दर...या पैशात लागवड सोडा पण प्रवास खर्चही निघत नाहीय. आणि मोसंबी परत आणनं परवडणारं नव्हतं. त्यामुळे कृष्णाने मोसंबी फेकून दिली.

कृष्णा पवार आणि त्यांची पत्नी मीना पवार दोघेही शेतीत राबतात. तूर आणि मोसंबीतून पैसे हाती लागले नाहीत. त्यामुळे दोन मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे.

ही कथा फक्त एकट्या कृष्णा पवारची नाहीतर....राज्यातील बहुतांश शेतक-यांची अवस्था अशीच आहे..

निसर्गाने साथ दिली तूर चांगली पिकली मात्र सरकारने दगा दिला. मोसंबी चांगली आली मात्र बाजार भावानं दगा दिला. यासगळ्यात बळीराज्याच्या समोर असलेल्या समस्यांचा डोंगर मात्र तीळमात्रही कमी झालेला नाही.

First published: April 29, 2017, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading