गडकरींच्या बंगल्यासमोर 'दिवाळी आंदोलन, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना अटक

गडकरींच्या बंगल्यासमोर 'दिवाळी आंदोलन, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना अटक

शेतकऱ्यांना केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत तोकडी

  • Share this:

नागपूर, 11 नोव्हेंबर: केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करावा. त्याचबरोबर राज्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदत मिळावी, या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana agitation) आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) आंदोलन केलं.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या बंगल्याकडे निघालेले संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी पोलिसांनी अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास नितीन गडकरींच्या बंगल्यासमोर दिवाळी साजरी करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

हेही वाचा..शिवसेनेला धक्का! काँग्रेसची ताकद वाढणार, रणजितसिंह देशमुख परतले स्वगृही

स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूरात संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहे. संविधान चौकात दिवाळी फराळ, आकाश कंदील आणि दिवे लावून आंदोलन करण्यात आलं.

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत तोकडी आहे. त्यामुळं केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय केंद्र सुरू करण्यासाठी करावे. सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार रुपये जाहीर करावी, पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्राने बाध्य करावे आणि केंद्राने केलेला कृषी विधेयक रद्द करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. राज्यात सर्वच केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढं शेतकऱ्यांची व्यथा मांडावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा..अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल, दोन पोलीस निलंबित

काय म्हणाले रविकांत तुपकर?

'लोकशाही मार्गानं आम्ही गडकरी यांच्या निवस्थानाकडे निघालो होतो. मात्र आम्हाला अमानवीय पद्धतीने आम्हाला पोलिसांनी अटक केली आहे. आमच्याशी झटापट केली. हे निंदनीय आहे. आमचं आंदोलन दडपण्याचे प्रयन्त करत आहे. याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हा विषय सांगू, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 12:33 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या