...तर उद्या नगरपालिका फोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेनं जेसीबी फोडून दिला इशारा

...तर उद्या नगरपालिका फोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेनं जेसीबी फोडून दिला इशारा

नागरी वसाहतीत कचरा टाकत असल्यानं सरिता गायकवाड या संतप्त झाल्या आणि वारंवार सांगूनही ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे संताप अनावर झाला.

  • Share this:

बीड, 24 ऑक्टोबर : बीड नगरपालिकेकडून नागरी वसाहतीत कचरा टाकला जात असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षांना राग अनावर झाला आणि त्यांनी भररस्त्यात जेसीबीवर चढून इशारा दिला आहे. महिला अध्यक्षा सारिका गायकवाड यांनी जेसीबीवर चढून लाकडाने तोडफोड केली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी आणि नागरिकांना मोठा त्रास होत आहे त्यामुळे तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरी वसाहतीत कचरा टाकत असल्यानं सरिता गायकवाड या संतप्त झाल्या आणि वारंवार सांगूनही ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे संताप अनावर झाला. त्यांनी जेसीबी अडवून त्यावर चढून त्याची तोडफोड केली आहे. ही घटना बीड शहरातील नाळवंडी परिसरातील आहे.

हे वाचा-'भीक देता की मदत? ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'

आता जेसीबी फोडून निषेध केला पण उद्या नगरपालिका फोडू असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला आहे. प्रशसनानं यावर तातडीनं कारवाई करावी असंही त्या म्हणाल्या आहेत. अनेक वेळा सांगून देखील कचरा टाकत असल्याने गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट जेसीबर चढून जेसीबीच फोडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 24, 2020, 1:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या