'महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं अजिबात दुःख नाही; पण लोकशाहीसाठी हे घातक' : राजू शेट्टी
'महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं अजिबात दुःख नाही; पण लोकशाहीसाठी हे घातक' : राजू शेट्टी
शेट्टी म्हणाले, सरकार पडत असल्याचं दुःख नाही, कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही, हे स्पष्ट झालं आहे
सांगली 24 जून : सध्या राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशात आता या संपूर्ण परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana President Raju Shetty) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही, असं राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटलं आहे.
शेट्टी म्हणाले, सरकार पडत असल्याचं दुःख नाही, कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, शेट्टी यांनी भाजपलाही यावरुन टोला लगावला आहे.
आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर
शेट्टी पुढे म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जात आहे, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे'.
'महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं अजिबात दुःख नाही; पण लोकशाहीसाठी हे घातक' : राजू शेट्टी pic.twitter.com/Q6qJPjzvp5
बंडखोर आमदारांवर निशाणा साधत राजू शेट्टी म्हणाले, 'एखाद्या पक्षाचं नाव घेऊन तुम्ही निवडून येता आणि नंतर त्या पक्षालाच विसरता. ही प्रवृत्ती वेगाने वाढत चालली आहे आणि देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. आज ना उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरही अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळाची पावले ओळखा.'
बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून का बाहेर पडले ?
शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही आमची भूमिका घेऊन इथून पुढे वाटचाल करणार आहोत असा निर्णय कुठेतरी घ्यावा लागेल. मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो की, महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे सर्व संबंध संपले आहेत, असं राजू शेट्टी यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केलं होतं.
राजू शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वी महापूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांचा होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावा यासाठी राजू शेट्टींचा संघर्ष होता.
याशिवाय भूमीअधिग्रहन कायदा, एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय हे महाविकास आघाडी सरकारने घेतले. हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ते रुचलं नाही आणि अखेर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.