स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडणार?

बुधवारी पुण्यात स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर सत्तेतून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा होऊ शकते.

  • Share this:

पुणे,29 ऑगस्ट: गेले बरेच दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना  राज्य सरकारमधून  बाहेर पडण्याची चर्चा होती. पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी पुण्यात स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर राज्य सरकारमधून  बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा होऊ शकते. राजू शेट्टी या बैठकीनंतर आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडलीच तर त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

First published: August 29, 2017, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading